Uncategorized
सत्याग्रह आंदोलनाची दखल न घेतल्याचा निषेधार्थ आंदोलक निलेश वाळूंज यांच्या सह कार्यकर्त्यांनी केले सामूहिक मुंडण
शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
राज्य महामार्ग १०३ वरील “आमदाबाद ते मलठण रस्ता व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ठ आणि अशास्त्रीय कामांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलनास आठ दिवस होवून ही प्रशासनाने वाळूंज यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा निषेधार्थ तहसिल कार्यालयातील अवारात वाळूंज यांच्या सह काही कार्यकर्त्यांनी डोक्यावरील केस काढून प्रशासनाचा निषेधार्थ सामूहिक मुंडण आंदोलन केले .
त्याच बरोबर उद्या सोमवार दिनांक ९ जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले .
निलेश वाळूंज , सागर रासकर , दादाभाउ कुरुंदळे , कल्पना पुंडे , मान्यता वाळूंज यांच्यासह अन्य कार्यकर्त्यानी मुंडण केले .
यावेळी सुनिता वाखारे , सोनाली दसगुडे, भाऊसाहेब लाळगे,, गौतम कुदळे, शेखर कुरंदळे बबलू कुरुंदळे प्रताप दसगुडे ज्ञानदेव माऊली कुरंदळे सोमनाथ देव्हाडे , अर्णव कुरुंदळे आदी उपस्थित होते .
यावेळी वाळूंज म्हणाले की
या आंदोलना संदर्भात राष्ट्रपती कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्या आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करू नये आंदोलनाची दखल घेतली गेली नाही त्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून राज्य मार्ग-१०३ (आमदाबाद ते मलठण) या रस्त्याच्या निकृष्ट कामांची सखोल व नि:पक्ष चौकशी करावी, सदर रस्त्याची दक्षता गुण नियंत्रण मंडळामार्फत तत्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
व तपासणी व चौकशी अहवाल सार्वजनिकपणे प्रसिद्ध करून, रस्त्याचे काम नव्याने दर्जेदार पद्धतीने सुरु करावे. गोपनीयतेचा आडोसा न घेता, पूर्वी रामलिंग ते अन्नापूर रस्त्यावर झालेल्या निकृष्ट कामाचा दक्षता गुणनियंत्रण अहवाल जनतेसमोर सादर करावा. या प्रकरणात न्यायालयाने काही कारवाई करू नये असा आदेश केला असल्यास ते आदेश जनतेपुढे ठेवावेत.
गोपनीयतेचे कारण न देता तत्कालीन मुख्य अभियंता यांनी सदर प्रकरणात दिलेले सर्व पत्रव्यवहार आणि आदेश जनतेसमोर मांडावेत.वरील दोन्ही निकृष्ठ कामांबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर २०१७ च्या शासन निर्णयानुसार गुन्हे दाखल करावेत.
मागण्या करीत वाळूंज यांनी आंदोलन सुरु केले होते .