क्राईम

शिरुरला हादरवून सोडणा-या तिहेरी हत्याकांडाचे गूढ पोलीसांनी उकलले .

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरूरला हादरवून सोडणाऱ्या तिहेरी हत्याकांडाचे  गूढ अखेर पोलिसांनी उलगडले आहे.लग्नाची मागणी
करीत असल्याने महिला व दोन मुलांचा खून गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले आहे .
    25 मे रोजी पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती जवळ ग्रोवेल कंपनीच्या मागे तीस वर्षीय महिला व दोन लहान मुले जळालेल्या मृत अवस्थेत मृता अवस्थेत मृता अवस्थेत जळालेल्या स्थितीत आढळून आले होते. कोणताही पुरावा नसताना खून झालेल्या महिला व तिच्या दोन मुलांची ओळख पटवणे व आरोपीचा माग  घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
पोलीस तपासात मृत व खून झालेल्या  महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे वय २५ वर्ष रा. वाघोरा, ता माजलगाव जि बीड असे असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती केशव सोनवणे याचेकडे चौकशी केली असता, स्वाती सोनवणे ही तिचे दोन मुलांसह आळंदी येथे तिचे आई वडीलांकडे गेली होती. तिचे व नवऱ्याचे भांडण होत असल्याने स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज वय २ वर्षे, व विराज १ वर्षे यांचे सह स्वातीचे बहीणीचा दिर गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याचे  मोटार सायकलवरून 23 मे  रोजी  आळंदी येथून गेलेली असल्याची माहिती समोर आली.
मृत महिला स्वाती केशव सोनवणे हिचे आई वडील हे आळंदी येथे मोलमजूरी करतात, त्यामुळे त्यांनी तिचे बाबत पुन्हा माहिती घेतली नाही. ती कोठे आहे हे त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांनी  गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यास  ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले.
आरोपी गोरख पोपट बोखारे याचे भावाला मृत स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृत स्वाती ही आरोपीचे चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत स्वाती व तिचा नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत , त्यामुळे गोरख बोखारे हा त्यांचेतील वाद मिटवत असे,  बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांचेत प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यामुळे  स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती.
२३ मे २०२५  रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेवून सरदवाडी शिरूर येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे-नगर हायवे रोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे कच्चा  रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
 गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने  दि. ११/६/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
हा  तपास पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल ,  अप्पर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे,  पोलीस उपअधीक्षक  गणेश बिरादार , प्रशांत ढोले,  एस.डी.पी.ओ.  बापूराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव  पोलीस निरीक्षक  महादेव वाघमोडे, विश्वास जाधव,  दत्ताजीराव मोहिते  निळकंठ तिडके,  अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे , दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी
केला .
                   चौकट
सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्याने  पोलीस अधीक्षक  संदीप सिंह गिल  यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. स्था.गु.शा. व शिरूर उप विभागातील पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांची तातडीने बैठक घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना देवून मार्गदर्शन केले. मृतदेहातील महिलेचे हातावर असलेले “जयभिम, Rajratan, mom dad, RS” अशा गोंदण (टॅटू) चे आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध लावण्याकरीता सुरूवातीस ७ तपास पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज वाघोली ते राहुरी पर्यंत चेक करण्यात आले. सुमारे १६५०० भाडेकरू तपासण्यात आले, चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एम.आय.डी.सी. तील कामगारांकडे तपास केला गेला, तसेच मृतदेहाचे हातावरील नावाचे आधारे बँकामधील काही खातेदारांची माहिती घेवून तपास करणेत आला, आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील सेविका यांचे कडून लहान मुलांचे अनुषंगाने तपास करून लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करणेत आला. दरम्यान हातात येणारे संशयित त धागेदोरे पडताळणेत येत होते. परंतु मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले नाही.मृतदेह आढळून आले त्यावेळी पावसाचे प्रमाण खूप होते, त्यामुळे घटनास्थळाचे आसपास कोणत्याही प्रकारे टसे उमटल्याचे दिसून येत नव्हते, दुर्गम भाग असल्याने घटनास्थळापासून जाणारे येणारे रोडवर दूर-दूर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हते.
पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी  त्यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण जिल्हयातील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात स बैठक घेवून  सर्व अंमलदारांना सूचना करत एस.डी.पी.ओ. शिरूर प्रशांत ढोले व स्था.गु.शा.चे पो.नि. अविनाश शिळीमकर यांचे अखात्यारीत एकूण २८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात रवाना केली होती . प्रत्येक जिल्हयातील स्था.गु.शा.चे प्रभारी अधिकारी यांचेशी  अविनाश शिळीमकर व  महादेव वाघमोडे यांनी समन्वय साधला. सर्व तपास पथकामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जावून मानव मिसींगची माहिती घेवून पडताळणी करण्यात आली. बीड जिल्हयात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग नं. १२/२०२५ दि ०९/५/२०२५ मध्ये एक महिला मिसींग असलेबाबत नोंद आढळून आली. सदर महिला ही मृत महिलेच्या वर्णनाची असल्याने त्याबाबत सखोल तपास करणेत आला.
व त्यातून खूनाचा गुन्हा उलगडला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button