Uncategorizedराष्ट्रीय

स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूका राष्ट्रवादी कॉग्रेस ताकदीने लढविणार : शिवाजीदादा आढळराव पाटील

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस पूर्ण ताकदीने लढवणार आहे .निवडणूकीबाबत वरच्या पातळीवर महायुतीचा  निर्णय झाल्या तर चांगलच आहे .युती नाही झाली तर स्वतंत्रपणे राष्ट्रवादी निवडणूक लढवेल असे सांगून पुणे जिल्ह्यात पक्ष चांगला स्थितीत असल्याचे म्हाडा पुणे चे सभापती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले .

आढळराव शिरुर शहरात आले असता बातमीदारांसोबत बोलत होते .
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार ,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , माजी सभापती विठ्ठल पवार , भाजपाचे बाबूराव पाचंगे , प्रिया बिरादार आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एमईपीएल कंपनीचा प्रदूषणाचा विषय गंभीर असून या कंपनीस नव्याने ६५ एकर जमिन देण्यास विरोध केला होता. सदर कंपनीचा मालकावर कारवाई झाली पाहीजे असे स्पष्ट मत व्यक्त केले . तत्काळीन उद्योगमंत्र्यानी ६५ एकर जागा कंपनीस दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर कारवाई करण्यासाठी आधिका-यांना पाठवण्या ऐवजी अध्यक्षांनी यावे . कंपनी करत असलेल्या प्रदूषणा संबधित विषया संदर्भात अनेक नेते मंत्री येवुन गेले आहेत. एमईपीएल कंपनीचा मालकावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील १८ जिल्ह्यातील घातक कचरा या कंपनीत येतो . मोठ्या लोकसंख्येचा ठिकाणी हा प्रकल्प आणणे योग्य नाही . जिथे लोक वस्ती नाही. तिथे या कंपनीचा प्रकल्प व्हायला पाहीजे होता असे ते म्हणाले .
शिरुर शहरातील विविध विकासकामाच्या संदर्भात आगामी १५ दिवसात मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या समवेत चर्चा करणार आहे . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस पूर्ण ताकदीने लढवणार आहे .निवडणूकीबाबत वरच्या पातळीवर युती झाली तर चांगलच आहे .
युती नाही झाली तर स्वतंत्रपणे राष्ट्रवादी निवडणूक लढवेल . पुणे जिल्ह्यात पक्ष चांगला स्थितीत आहे . शिरुर नगरपरिषदेचा विकास कामाचा आढावा पुढील १५ दिवसात आढावा घेणार असून डीपीसीत आठ कोटीची कामे शिरुर साठी सूचवली असल्याचे आढळराव म्हणाले .
बंद पडलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्या संदर्भात जनआकोश होत नाही तो पर्यत या प्रश्नांच घोंगडे भिजत राहिल असे आढळराव म्हणाले .
शिरुर शहरातील नागरिकाच्या गरजेसाठी ८० कोटीची पाणीपुरवठा योजना आणली आहे पण ठेकेदारातील समन्वया अभावी कामात विलंब होत असल्याचे आढळराव म्हणाले .
राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये सन्मान मिळत असून स्वगृही जाण्याचा विषय नसल्याचे आढळराव एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button