क्राईम
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}.पाटबंधारे विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कालवा फोडून पाण्याचा प्रवाह बदलत अनधिकृतरित्या सिंचनासाठी पाणी वापरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 326(ब), 324(5), महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 चे कलम 93 तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पाईपलाईन सायफन करून कालवा फोडला. त्यामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून सिंचन व्यवस्थेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच अनधिकृतरीत्या कालव्याचे पाणी वापरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
750 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.


