Uncategorized
बीएसएनएल कार्यालयात घरफोडी; 1लाख 58 हजार रु. चे मदरबोर्ड चोरीला
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील बीएसएनएल कार्यालयात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 1 लाख 58 हजार 400 रुपयांचे इलेक्ट्रॉनिक मदरबोर्ड (पीसीबी) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी राजेश बळीराम भुरले (वय 43, रा. उत्सव रेसिडेन्सी, वाघोली, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 12 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 13 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील इतर खोल्यांचे कुलूपही तोडून तेथील बीएसएनएल कंपनीचे 33 पीसीबी (मदरबोर्ड) चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 58 हजार 400 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 58 हजार 400 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 649/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305, 331(3) व 331(4) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.





