Uncategorizedविशेष

डांबरी रस्त्याचे खोदकाम केल्याप्रकरणी पालिकेने केला १ लाख ३८ हजार ८६० रु चा दंड

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) टोरंट गॅस प्रा. लिमिटेड कंपनीस शिरूर नगरपरिषद हद्दीतील जूने मार्केट यार्ड समोरील कल्याणी भेळ दुकान पासून ते शिरूर शहर बसस्थानक मागील बाजुपर्यंत डांबरी रस्त्याचे खोदकाम केल्याबाबत १ लाख ३८ हजार ८६० रु चा दंड मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केल्या असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपप्रमुख महिबूब सय्यद व प्रवासी संघटनेचे अनिल बांडे यांनी दिली .
त्यांनी सांगितले की याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता .

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक यांना नगरपरिषदेने पत्र दिले आहे .सय्यद व बांडे यांनी सांगितले की सदर पत्रात म्हटले आहे की  शिरूर नगरपरिषद हद्दीत कंपनीचे भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे.या कामास नगरपरिषद कार्यालयाकडून खोदकाम करणेसाठी सुधारित परवानगी देणेत आली आहे . परंतु सदर सुधारित परवानगीच्या मार्गामध्ये कंपनी कडून डांबरी रस्त्याचे खोदकाम करणेत आलेले आहे. सदर ठिकाणी कंपनीस देणेत आलेल्या परवानगी मधील मातीच्या साईटपट्टी खोदकाम ऐवजी डांबरी रस्ता खोदकाम झाल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणीची स्थळपाहणी पालिकेने केली असून सदर ठिकाणी डांबरी रस्त्याचे ९० मी लांबी १.२ रुंदी इतके खोदकाम करणेत येऊन नगरपरिषद मालमत्तेचे नुकसान केल्याचे दिसून आले . सदर कामाकरिता नगरपरिषद कार्यालयाच्या देणेत आलेल्या सुधारित परवानगी मधील अटी व शर्ती नुसार रु.१,३८,८६०/- रकमेचे अंदाजपत्रक होत आहे.तरी सदर अंदाजपत्रकातील रु.१,३८,८६०/- इतकी रक्कम दंड म्हणून भरणा करण्यात यावी व सदर ठिकाणी खोदकाम झालेला डांबरी रस्ता तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत करून द्यावा .अन्यथा कंपनीने भरलेल्या सुरक्षा अनामत रक्कम रु.३१,४५,४३८/- मधून कपात करणेत येईल असे पालिकेने संबधित कंपनीस कळविले असल्याचे सय्यद व बांडे यांनी सांगितले . तसेच या पुढे नगरपरिषद हद्दीत कोणतेही खोदकाम करतांना कंपनीने नगर अभियंता तसेच सबंधित विभागाचे कर्मचारी यांना पूर्वसूचित करूनच खोदकाम करावे .अन्यथा कंपनीस देणेत आलेली खोदकाम परवानगी रद्द समजली जाईल व योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा ही पालिकेने दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button