Uncategorized

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ या स्पर्धेच्या  निकाल जाहीर झाला असून शिरूर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, शिरूर ला जाहीर

  शिरूर  दिनांक { डेली न्यूज पोस्ट टीम )

राज्य शासनाने  महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत  महागणेशोत्सव  महाराष्ट्राचा राज्य उत्सव आयोजित केला होता. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या  निकाल जाहीर झाला असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, शिरूर ने प्राप्त केला आहे. येथील श्रीमंत हलवाई गणेश मित्र मंडळ हे शिरुर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील महत्त्वाचे गणेश मंडळ आहे. मंडळाच्या वतीने सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असुन मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी असे ५० वे वर्षं साजरे केले.
सन १९७५ मध्ये हलवाई व्यवसायिक सुभाष पुजारी, अरुण काळे, शंकर परदेशी, भोलेनाथ परदेशी,   रामलाल परदेशी ,अरुण मुसळे , दिलीप मुथ्था , गणपतराव पांढरकामे , सुभाष घोडके, कोळपकर बंधू, यांनी व त्यांच्या सहका-यांनी श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ अर्थात त्यावेळच्या महात्मा  गांधी गणेश मित्र मंडळाची स्थापना केली . काळांतराने हेच मंडळ श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ या नावाने ओळखले जावू लागले .
 पुणे जिल्हा ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात येणारे
सन -२०२४ चे गणराया ॲवार्ड प्रथम क्रमांक प्रप्त केलेले हलवाई चौक गणेश मित्र मंडळ सातत्याने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करतात  . मंडळाने काही वर्षापूर्वी विसर्जन मिरवणुक साध्या पध्द्तीने काढून त्यातून वाचलेल्या पैसातुन परिसरात सी. सी. टी .व्ही कॅमेरे बसविलेले आहेत . त्याखेरीज मंडळाच्या उत्सव मंडप खड्डे विरहित असा आहे . शहरात मंडळाच्या वतीने महिलांसाठी सामुहिक महिला आरती सर्व प्रथम सुरु करण्यात आली .त्याखेरीज पर्यावरण संरक्षण ,निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत गणेशोत्सव काळात महिला आरतीला महिलांना तुलसीच्या रोपासह देशी झाडांची रोपे भेट दिली जातात . वाचन संस्कृती वाढविण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्याना पुस्तके वाटण्यात येतात. गणेशोत्सव काळात महत्वाची भुमिका बजाविणारे पोलीस बांधव व नगरपरिषद स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्या विशेष सन्मान  कृतज्ञता सोहळ्या दवारे मंडळाच्या वतीने केला जातो. त्याच बरोबर आरोग्यशिबीराचे ही आयोजन केले जाते. आरोग्यपर जनजागृती व प्रबोधनाचे ही कार्यक्रम घेतले जाते . शहरात गणेश जयंती निमित्त महाप्रसाद ही मंडळाचा वतीने सुरु करण्यात आला .स्वच्छता अभियानातही मंडळाचा सक्रीय सहभाग असतो . गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य व ड्रेसेस ही देण्यात येतात .
 शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना ‘ प्रेरणादायी शिक्षक ‘पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येते . आता पर्यत २५ हून आधीक शिक्षकाना सन्मनित करण्यात  आले आहे .
कोरोनोच्या काळात शहरातील गरजूना अन्नधान्यचे कीट, सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्ताना अन्न धान्य व अन्य वस्तूंची मदत मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे .
लोकवर्गणीतुन हलवाई गणेशास चांदीचे आभूषणे करण्यात आली आहे . श्री. गणेश जयंतीस हजारोंच्या संख्येने महाप्रसादासाठी भाविक हलवाई गणेश येथे येत असतात . शहरात गणेश जयंतीच्या दिवशी मोठया प्रमाणावर महाप्रसाद वाटप करण्याची परंपरा ही सर्वप्रथम हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने सुरू केली.
दरवर्षी पौराणिक ,धार्मिक ,अथवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा असून सर्वधर्मीय नागरीक मोठया संख्येने मंडळात कार्यरत आहे .
साई गणेश , विठ्ठल गणेश, बालाजी गणेश, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाडे लावा, झाडे जगवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी समर्थ गणेश, पोटु पतलू, असे विविध देखावे मंडळाचे गाजलेले देखावे आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस यांच्या वतीने मंडळाच्या कार्याची दखल घेवुन मंडळास बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आलेले आहे .१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन व मुलांना खाउवाटप ही केले जाते .
त्याच बरोबर विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .
यंदा मंडळाचा उत्सवाचे ५० वर्ष असून या वर्षात मंडळास प्रथम क्रमांकाचे गणराया ॲवार्ड जाहीर झाले होते .

अशोक काळे, शाम परदेशी, अविनाश जाधव, प्रा. सतीश धुमाळ, रणजीत गायकवाड, सिकंदर मणियार, शेरसिंग परदेशी, स्वप्नील चौधरी, प्रणव मुसळे, विजय नरके, राकेश परदेशी, प्रेम मूसळे, मयुर काळे, प्रसाद लांडे, मनिष मुथा आदी कार्यकर्त्यानी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विविध धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजनात पुढाकार घेतला होता.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदुलालजी बुधमलजी चोरडिया यांना 81 वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा
   सुवर्णमहोत्सवी वर्षांत हलवाई चौकाच्या राजाच्या  समोर  सामुदायिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात महिलांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येथील सिद्धीच्या पहाडावर सिद्धेश्वर वनराई व सह्याद्री वनराई परिसरात दिवसभर श्रमदान करून शेकडो देशी वृक्ष लावले.  परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भजन सम्राट  बबलु दुग्गल यांच्या साई भजन संध्या या सोहळ्यातही परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईंवरील गीते यावेळी सादर करण्यात आली.
श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संजीवनी ब्लड बॅंकेच्या सहाय्याने आयोजित केलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरात १५० हून अधिक नागरीकांची रक्तदाब, मधुमेह, ह्रदय तपासणी करण्यात आली. मीरा नर्सिंग होम चे डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनिता पोटे यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. प्रामुख्याने नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व परिसरातील हलवाई व्यावसायिकांची या शिबिरांतर्गत तपासणी करण्यात आली. गौतम मुनीजी महाराज यांनी शिबिरात भेट देऊन सदीच्छा व्यक्त  केल्या. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण व श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त रमाकांत बोरा यांनी शिबिराला भेट दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button