Uncategorized

शिरूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजया दशमी उत्सव व शस्त्रपूजन

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) :

हिंदू समाजातील धर्म, शौर्य, सद्गुण आणि न्याय यांच्या विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिरूर उपखंडातर्फे रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषद मंगळ कार्यालय, शिरूर येथे सायं. ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा दिवस हिंदू संस्कृतीसाठी प्रेरणादायी व पवित्र मानला जातो. श्रीरामांनी रावणाचा पराभव करून धर्माचा विजय मिळविल्याच्या स्मृतींनी विजयादशमीचा दिवस इतिहासात अजरामर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शस्त्रपूजनाचा सोहळा देखील आयोजित करण्यात येतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची सुरुवात देखील विजयादशमीच्या दिवशीच झाली असून, या वर्षी संघाला कार्यरत होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.डेली न्यूज पोस्ट टीम च्या वतीने हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. संघटनेचे कार्य हे केवळ शाखापुरते मर्यादित नसून संपूर्ण हिंदू समाजाचे उत्थान, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधन आणि संस्कारमूल्यांची जपणूक हे उद्दिष्ट ठेवून ते देशभरात झपाट्याने विस्तारले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.  योगेश सुभाष उपलेंचवार उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रचार प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अतुल अग्निहोत्री  मार्गदर्शन करणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिक, कार्यकर्ते व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदुलालजी बुधमलजी चोरडिया यांना 81 वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

 असे आवाहन  रा.स्व.संघ, शिरूर तालुका कार्यवाह दत्तात्रेय धोंगडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button