Uncategorized
बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणावले
वर्दीलाही एक हळवं, जिवंत मन असतं.
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}
मुलगा हरवल्याची आईची तगमग आणि तिच्या कुशीत पुन्हा मिळालेलं बाळ — हा क्षण पाहून पोलिसांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. मानवतेचा गहिवर दाखवणारी ही घटना रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 27 ऑक्टोबर) घडली.

दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिरूर येथील रिक्षाचालक सद्दाम अकबर खान हे आपल्या रिक्षेतून तीनवर्षांचा एक चिमुकला घेऊन थेट र पोलिस ठाण्यात आले. “हा मुलगा मला कारेगाव येथील अहिल्यानगर-पुणे रोडलगत असलेल्या ‘पाटीलवाडा’ हॉटेलजवळ सापडला. बोलत नाही, ओळख सांगत नाही. कृपया त्याच्या आई-वडिलांचा शोध घ्या,”
असे त्यांनी सांगत तो चिमुकला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केला.
असे त्यांनी सांगत तो चिमुकला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केला.पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार दोन पथके तयार करून मुलाचे पालक शोधण्याचे काम हाती घेण्यात आले.
या मोहिमेत पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेत, मुलाचे फोटो-व्हिडिओ प्रसारित करून माहिती देण्याचे आवाहन केले.
या मोहिमेत पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेत, मुलाचे फोटो-व्हिडिओ प्रसारित करून माहिती देण्याचे आवाहन केले.सायंकाळी कारेगाव येथील दिव्यभारती राम खिलारी या महिला धाव घेत पोलिस ठाण्यात आल्या. “हा माझा मुलगा मटरू राम खिलारी (वय ३) आहे,” असे सांगत त्यांनी हुंदके देत आपला व्यथित अनुभव मांडला. “मी थोड्या वेळासाठी बाहेर गेले होते, आणि बाळ घरातून बाहेर पडले. खूप शोध घेतला पण सापडले नाही. सोशल मीडियावर
व्हिडिओ पाहताच मी थेट धाव घेतली,” असे त्या म्हणाल्या.
व्हिडिओ पाहताच मी थेट धाव घेतली,” असे त्या म्हणाल्या.पोलिसांनी सर्व खात्री करून बाळाला आईच्या मिठीत दिले. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. चिमुकल्यालाही पोलिसांनी इतक्या प्रेमाने जपले होते की तो आईकडे परत जाण्याच्याही आधी त्यांच्या मांडीवर खेळत होता.
महिला अंमलदार शीतल रौंधळ आणि पूजा नाणेकर यांनी त्याला चॉकलेट व खेळणी देऊन मायेने जवळ घेतले. हे दृश्य इतके भावनिक होते की उपस्थित पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले.
महिला अंमलदार शीतल रौंधळ आणि पूजा नाणेकर यांनी त्याला चॉकलेट व खेळणी देऊन मायेने जवळ घेतले. हे दृश्य इतके भावनिक होते की उपस्थित पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले.ही संवेदनशील आणि माणुसकी जपणारी कामगिरी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैजनाथ नागरगोजे, पो.कॉ. आकाश सवाने, पो.कॉ. संदीप भांड, योगेश गुंड तसेच महिला अंमलदार शीतल रौंधळ व पूजा नाणेकर यांनी केली.
या घटनेतून स्पष्ट झाले की वर्दीलाही एक हळवं, जिवंत मन असतं.
