आशेचे द्वार प्रतिष्ठानचा वतीने शिरूर नगरपालिका मराठी शाळेत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
शिरूर, दिनांक { डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचे द्वार प्रतिष्ठानने समाजप्रबोधनाचा आदर्श ठेवत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला. या उपक्रमातून तब्बल ३५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ मिळाला असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली.
या कार्यक्रमात अध्यक्ष जोसेफ पवार, खजिनदार प्रशांत खवाडिया, सचिव सचिन जाधव, डायरेक्टर प्रभु लोणे, पर्यवेक्षक रघुनाथ हुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे स्वयंसेवक, फ्रान्सिस महाकाळे व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचवले.शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ व वर्गशिक्षिका अनीता धुमाळ यांनी संस्थेचे आभार मानले. भविष्यातही असे उपक्रम राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदतीचा हात पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.