विशेष
शिरुर येथे ‘स्वर्गरथ’ सेवेस ९ वर्ष पूर्ण

शिरुर दिनांक ( वार्ताहर )शिरुर शहर व पंचक्रोशीत निधनानंतर राहत्या घरापासून मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमी पर्यत नेण्याकरीता सकल जैन समाज व स्पंदन प्रतिष्ठान शिरुर यांच्या वतीने माफक दरात वाहन व्यवस्था ‘ स्वर्गरथ ‘ या नावाने उपलब्ध करुन देण्यात येते .

या सेवेस ७ मार्च रोजी नउ वर्ष पूर्ण झाले .९ वर्षापूर्वी ७ मार्च रोजी महाशिवरात्रीचा दिवशी शिरुर शहरासाठी या स्वर्गरथ सेवेची सुरुवात करण्यात आली होती . त्यानंतर या सेवेच्या विस्तार करुन पंचक्रोशीतील गावे वाड्या वस्तीसाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.
.स्वर्गरथ सेवेस ९ वर्ष झाल्याबद्दल
.स्वर्गरथ सेवेस ९ वर्ष झाल्याबद्दल स्वर्गरथाचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकजागृती संघटनेचे ॲड . ओमप्रकाश सतीजा , शिरुर शहर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक , माजी नगरसेवक विनोद भालेराव , माजी नगरसेवक सुकुमार बोरा , माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी भाषण करुन स्पंदन प्रतिष्ठान च्या कार्याचे कौतुक केले .

यावेळी स्पंदन प्रतिष्ठानचे राहुल बोथरा यांनी प्रतिष्ठानचा वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली . संघपती भरत चोरडीया , रमेश कर्नावट, ज्येष्ठ्य नेते पांडुरंग अण्णा थोरात , माजी नगरसेवक मंगेश खांडरे,
माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल , नाना खांडरे
शिवसेनेचे खुशाल गाडे ,शिरुर सोसायटीचे चेअरमन आप्पा वर्पे , नीलेश नवले ,
,खिदमत फाउंडैशनचे मुश्ताक शेख , हाजी आसिफ शेख आदी यावेळी उपस्थित होते. जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना
यांनी सर्वांचे आभार मानले.








