Uncategorized

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त शिवव्याख्यात्या अर्चना भोर कारंडे यांचे व्याख्यान

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे : - शिवव्याख्यात्या अर्चना भोर कारंडे

 

 

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर आणि परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .व्हीजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त शिवव्याख्याता अर्चना भोर यांचे व्याख्यान झाले . महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याचा काळजी बरोबर स्वंत :च्या आरोग्याची काळजी घ्या .स्वंत :वर प्रेम करायला शिका . भारतातील कर्तृत्वान महिलांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला . राष्ट्रमाता जिजाउ मॉ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केला . कोणत्याही परिस्थितीत आपल्या चांगुलपणा कायम ठेवा जेवढे जमेल तेवढी इतरांना मदत करा . छावा चित्रपट पहावा असे ही आवाहन त्यांनी केले .माते विषयी व माती विषयी कृतज्ञ असावे असे ही ते म्हणाले .

यावेळी प्रास्ताविक स्कूलच्या मुख्याध्यापिका पसक्कीन काशी यांनी केले . वात्सलयसिंधू संस्थेच्या उषा वाखारे , मुख्याध्यापिका स्वाती थोरात , वृषाली मुसळे , हिलिंग लिव्हिंगचे संतोष सांबारे , समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त अविनाश जाधव , आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन शितल जाधव यांनी केले .

oplus_131074

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button