जागतिक महिला दिनानिमित्त ‘माझी आई माझ्या शाळेत’ या उपक्रमांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी
जीवन विकास मंदिर शाळा शिरुर मधील उपक्रम
å
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) जागतिक महिला दिनानिमित्त येथील जीवन विकास मंदिर शाळेत ‘माझी आई माझ्या शाळेत ‘ या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मातांची आरोग्य तपासणी करुन त्यांना संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्व समजावून सांगण्यात आले .
महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येत असतात . महिलांचे आरोग्य ही एक महत्वाची बाब असून संपूर्ण कुटुंबाची आरोग्यासह सर्व बाबीची काळजी घेणारी महिला स्वंत :च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते . महिलांनी स्वंत :च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे .जीवन विकास मंदिर शाळेतील बालवाडी ते इयत्ता पाचवीच्या वर्गातील २०० हून आधिक मातांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालय शिरुर यांचा वतीने करण्यात आली . त्याच बरोबर डॉ . सोनाली हार्दे व प्रियंका जावळे यांनी आरोग्य व आहार या विषयांवर मार्गदर्शन केले. आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप , संतुलित आहार , नियमित व्यायाम , नवीन गोष्टी शिकणे , चांगल्या छंदाची जोपासणा , आहारात कडधान्य व पालेभाज्याचा वापर व सकारात्मक विचार या गोष्टीना महत्व आहे आरोग्यांची हेळसांड अनेक आजारांना आमंत्रण देवू शकते . महिलांनी आरोग्य जपावे असे आवाहन हार्दे व जावळे यांनी केले .


