Uncategorizedक्रीडाशैक्षणिक

सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत १३ संघांचा उत्स्फूर्त सहभाग.

मुलांच्या गटात डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कुलचा तर मुलीच्या गटात शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ६ चा प्रथम क्रमांक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}दासनवमी निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि समर्थ सेवा मंडळ, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत शिरूर व परिसरातील १३ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.

समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक उमेश शेळके, डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, पोदार स्कूलचे प्राचार्य नीरज राय आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून दादासाहेब उदमले, डॉ. स्मिता कवाद, शिवाजी कुळाल व अपर्णा वाळसे यांनी काम पाहिले.

स्पर्धेत मुलांच्या गटात डेक्कन स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींच्या गटात शिरूर नगरपरिषद शाळा क्र. ५ ने अव्वल स्थान मिळविले.

निकाल पुढीलप्रमाणे :

मुली गट –

प्रथम : शिरूर नगरपरिषद शाळा क्र. ५

द्वितीय : ज्ञानगंगा गुरुकुल, शिरूर

तृतीय : शिरूर नगरपरिषद शाळा क्र. ६

उत्तेजनार्थ : पोदार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर

मुले गट –

प्रथम : डेक्कन स्कूल, शिरूर

द्वितीय : ज्ञानगंगा विश्व विद्यालय, शिरूर

तृतीय : पोदार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर

उत्तेजनार्थ : शिरूर नगरपरिषद शाळा क्र. ६

स्पर्धेचे नियोजन क्रीडा शिक्षक चंद्रकांत झांजे यांनी केले. बक्षीस वितरण स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुधाकर पोटे व विजयकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रिया नरवडे यांनी, तर आभार प्रदर्शन सखाराम पुरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button