धार्मिंकराष्ट्रीय

भगवान महावीर स्वामी जन्मकल्याण महोत्सवनिमित्त शिरुर शहरात शोभायात्रा व आरोग्य शिबीर

मिरवणूकीत भाविकांचा मोठा सहभाग

 

oplus_131074
oplus_131074
oplus_131074
oplus_131074
oplus_131074

शिरुर दिनांक (वार्ताहर )- भगवान महावीर स्वामी की जय , जय महावीर च्या जयघोषात भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवा निमित्त शिरुर शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली .
सकाळी शहरातील जैन स्थानकापासून भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मिरवणूक काढण्यात आली . कापड बाजार , राम आळी , मारुती आळी ,सरदार पेठ , हलवाई चौक , सोनार आळी , आडत बाजार , यशवंतराव चव्हाण चौक मार्गे मिरवणूक जैन स्थानकाजवळ पोहोचली . शोभायात्रेचा अग्रभागी अहिल्यानगर येथील सुप्रसिध्द असा स्वामी समर्थ बॅन्ड होता . त्यापाठोपाठ जैन धर्माचे झेंडे हाती घेतलेले ध्वजपथक होते . त्या पाठोपाठ मोठ्या संख्ये जैन बांधव व महिला भगिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगवान महावीर यांच्या जयजयकार व त्याच्या जीवनकार्यावरील गाणी गायली जात होती . मिरवणूक मार्गावर सुभाष चौक येथे आर्कषक सजावट करण्यात आली होती. त्याखेरीज मिरवणूक मार्गावर बिस्किटे चॉकलेट व थंडपेय यांचे वाटप ही करण्यात आले. माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनीही मिठाईचे वाटप केले. हलवाई चौकात हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी चॉकलेटचे वाटप केले .
मिरवणूकीत ,संघपती भरत चोरडिया , वसंतलाल गादिया , ,सतीश धाडिवाल , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, गोरक्षण पांजरापोळ चे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा , सुनील कांतीलाल बाफना , जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना , कपिल बोरा , देवल शहा , राहूल बोथरा , सुनील धाडिवाल ,चंदुलाल चोरडिया , अशिष नहार , ललित नहार , प्रवीण मुथ्था , प्राचार्य डॉ. अमोल शहा , अतुल बोथरा, नितीन भंडारी ,राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नाना पोटे , भाजपाचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, रवींद्र कर्नावट , जयेश संघवी, डॉ . बिपीन बोरा , प्रशांत गादिया ,रमणलाल भंडारी , नीलेश भळगट , राजेश शिंगवी  आदी सहभागी झाले होते .
मिरवणूक जैन स्थानकापाशी पोहचल्यावर कांचनकंवरजी महाराज साहब यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर लहान मुलांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .त्यानंतर गौतमी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
शिरुर नगरपरिषद मंगलकार्यालायात
महावीर जयंतीनिमित्त
गौतमलब्धि फाउंडेशन आणि जिनेंद्र ग्रुपचा वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .डॉ. प्रवीण महाजन, डॉ.निलेश उगले ,डॉ. सुप्रिका दुगड ,डॉ. अनिकेत चोपडा ,डॉ. भाग्यश्री पोखरणा सहभागी होणार आहेत .
शिबीरासाठी वैभव दिलीप खाबिया यांचे विशेष सहकार्य असणार आहे . शिबीरात लहान मुलांचे हृदयाचे, मेंदूचे, फुप्फुसाचे आजार, लहान मुलांचे अनुवंशिक आजार, दमा, माती खाणे तसेच रोजचे सर्दी, ताप याविषयी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार ,सर्व प्रकारचे त्वचा विकार, केसांच्या समस्या, नखांचे विकार, यावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार ,सर्व वयोगटातील मुलांची व व्यक्तींची दंतचिकित्सा, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार करण्यात येणार असल्याचे श्री सकल जैन श्रावक संघ, घोडनदी यांच्या वतीने सांगण्यात आले .
मिरवणूकी दरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button