शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) कवठे येमाई ,ता . शिरुर येथे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून सुमारे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीमुसार योगेश जिजाभाऊ सैद (वय ३४, रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
दिनांक २२ जुलै २०२५ रोजी रात्री ७ वाजल्यापासून ते २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम ६ हजार रुपये, विविध कृषी औषधांच्या बाटल्या, बियाण्यांचे पॅकेट्स तसेच हिक व्हिजन कंपनीचे सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा एकूण ६४,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत .