
शिरुर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम-24)सन -१९९९ च्या कारगिल युध्दात प्रत्यक्ष रणांगणावर लढून पाकिस्तान सैन्याला जाणारी रसद २३ दिवस रोखून धरण्याची कामगिरी करता आली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून युवकांनी सैन्यदलात सहभागी व्हावे असे आवाहन कारगिल युध्दात लढलेले सेवानिवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांनी केले.


आज सकाळी स्कूलचे विद्यार्थी गोलेगाव रोड या ठिकाणी राहत असेलल्या थेऊरकर यांच्या घरी पोहोचले. त्याच्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनीनी कॅप्टन प्रभाकर थेऊरकर व त्यांच्या पत्नी जनाबाई थेऊरकर यांचे औक्षण केले.
त्यांना पेढे भरवले व देशभक्तीपर पुस्तके , शाल, गुलाबाची फुले देवून त्याच्या सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय ‘व ‘वंदे मातारमच्या’ जयघोष केला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना व त्यांच्या प्रश्नांनाची उत्तरे देताना थेउरकर म्हणाले की कारगीलच्या युध्द भूमीवर लढताना आल व आपला विजय झाला या विजयात सहभागी होता आले. २६ जुलैला तिरंगा झेंडा फडकताना पाहता आला याचा अभिमान आणि आनंद असल्याची भावना व्यक्त केली .
कॅप्टन थेऊरकर हे कारगील युध्दाचा वेळेस 3 जुलै ते २६ जुलै युध्दभूमीवर होते . कारगिल युध्दाचा थरार व प्रत्यक्ष युध्द भूमीवरील अनुभव याची माहिती घेताना प्रत्यक्ष आपण युध्दभूमीवरच असल्याची अनूभूती विद्यार्थ्याना आली .


