Uncategorized
ग्राहकांच्या विश्वासाचा जोरावर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची प्रगती

शिरूर दिनांक( डेली न्यूज पोस्ट -24)
ग्राहकांच्या हितास सर्वोच्च प्रधान्य देत ग्राहकांच्या गरजेनुसार निर्माण केलेली उत्पादने व नवोन्मेष व ग्राहकांच्या विश्वासाचा जोरावर अल्ट्राटेक सिमेंट
कंपनीची प्रगती सुरु असून सिमेंट उत्पादनात देशात एक नंबर व जगात तीन नंबरची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी असल्याचे कंपनीचे अधिकारी सुमित येवले यांनी सांगितले.
येथील राजभोग बँक्वेट हॉलमध्ये आयोजित ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. शहरातील लोखंडे सेल्स कॉर्पोरेशनचे राजेंद्र लोखंडे व अरुण लोखंडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
अल्ट्राटेक कंपनीचे अधिकारी विकास दसगुडे व मयूर सरोदे हेही यावेळी उपस्थित होते.
येवले यांनी सांगितले की
बिर्ला अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा
44 देशात व्यवसाय चालतो.
.सिमेंट सह पेंट, रिअल इस्टेट सह बांधकाम मटेरियल असे विविध कंपनीचे उत्पादने आहे.
ही जगातील तीसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे.
देशात सर्वात जास्त सिमेंट उत्पादन व विक्री कंपनी करते. ग्राहकाच्या सातत्याने विचार करून आपली उत्पादने कंपनीने बाजारात आणली. दीड लाख डीलर आहेत. मेट्रोसह विविध पूल व बांधकामात या सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. . हे सिमेंट इको फ्रेंडली असल्याचे येवले यांनी सांगितले.
यावेळी स्वागत राजेंद्र लोखंडे व अरुण लोखंडे यांनी केले. आभार विकास दसगुडे यांनी मांनले.

