Uncategorized

अण्णापूर, ता. शिरूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात

शिरूर  ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) अण्णापूर (ता. शिरूर ) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात मोठ्या भक्तिभावात झाली आहे. संत परंपरेतील अखेरचे संत श्री. निळोबाराय यांची जन्मभूमी, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने व श्री गहिनीनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पुण्यभूमीवर गेल्या ३६ वर्षांपासून हा सोहळा भक्तिभावात साजरा होत आहे.

माजी उपनगराध्यक्ष मा.जाकिरखान शहीदखान पठाण यांना वाढदिवसाचा डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा..

या वर्षी सप्ताहाची सुरुवात ग्रामभूषण ह.भ.प. विलास महाराज पवार यांच्या कीर्तनाने झाली  असून, सांगता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. गुलाब महाराज खालकर (आर्वी, जुन्नर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. मधल्या दिवसांत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप (बीड), ZEE टॉकीज फेम प्रा. ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे (आमदाबाद), रामायणाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज रासकर (रामलिंग), युवा कीर्तनकार ह.भ.प. मोहिनीताई आवारी (वाडेगव्हाण, पारनेर), वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज शिंदे (उदापूर), प्रबोधनकार ह.भ.प. पोपट महाराज राक्षे (राजगुरूनगर) यांची कीर्तने सायं. ८ ते १० या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे होणार आहेत.

सप्ताहात दररोज सायं. ७ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, गावातील अन्नदात्यांकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान दिले जात आहे.

या सोहळ्याचे नियोजन हरिपाठ भजनी मंडळ, ग्रामपंचायत तसेच गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते  संतोष झंजाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button