Uncategorizedमहाराष्ट्रविशेष

शिरुरचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आकाश मोहितेचा प्रथम क्रमांक. सांगली ,सातारा , अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी

oplus_131106

शिरूर  दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)शिरूर येथील  राज्यस्तरीय वक्तृत्व  स्पर्धेत न्यू आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स  कॉलेज पारनेरचा  स्पर्धेत आकाश दत्तात्रेय मोहिते यांचा प्रथम क्रमांक आला.

येथील शिवसेवा मंदिराच्या सभागृहात

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  व बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी  प्रा. डॉ.बाळकृष्ण लळीत,   प्रा. डॉ. ईश्वर पवार,स्पर्धेचे संयोजक विश्वास दसगुडे, सोहम पवार, अर्णव बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

माजी उपनगराध्यक्ष मा.जाकीर खान पठाण यांना वाढदिवसाचा डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
स्पर्धेकरिता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय संस्कृती, अभिजात मराठी, भारतीय शेती, प्रश्न महाराष्ट्र जागविण्याचा, महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य, लय अवघड आहे उमगायला बाप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आदर्श विद्यार्थी, भारत महासत्ता होणार,
असे स्पर्धेचे विषय होते.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक –  प्रणव शशिकांत जाधव (छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय दुधोंडी, सांगली )यांचा तर तृतीय क्रमांक – नमिता सांगळे ( दिंगबर सराफ विद्यालय संगमनेर ), हिचा आला.
उत्तेजनार्थ बक्षीस आकाश वसंत बोडखे(मालपाणी लॉ कॉलेज, संगमनेर) प्रथमेश मच्छिंद्र धायगुडे (केएसी महाविद्यालय खोपोली जि रायगड ) व प्राची जावळे ( यशवंतराव चव्हाण कॉलेज , सातारा ) यांना मिळाले .
सिद्धी बाफना, मयूरेश देशपांडे, हर्षल थोरात, प्रणव जाधव, नमिता सांगळे, प्रणया माने, आकाश मोहिते,अक्षय पाटील, संतोष राजगुडे, प्रथमेश धायगुडे, ऋषिकेश पोंगे,इरफान शेख,भावना पवार, प्राची जावळे, शिफा पठाण, आकाश बोडखे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला
स्पर्धेचे बक्षिस वितरण व्हाईस चेअरमन सोन्याबापू दसगुडे व ग्रामपंचायत समिती सदस्य शिवाजीराव दसगुडे यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रास्तविक विश्वास दसगुडे यांनी केले . स्वागत व आभार  सोहम पवार यांनी मानले .
स्पर्धेचे परीक्षण प्रा .विवेक घोडेराव व प्रा. सतीश धुमाळ यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button