विशेष

शिरूर मधील प्रशासकीय इमारतीसमोर अपघात टाळण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर व दुभाजक बसविण्याची मागणी

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)शिरूर शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीसमोरून जाणाऱ्या पुणे–अहिल्यानगर मार्गावर अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर, दुभाजक, सिग्नल यंत्रणा तसेच दिशादर्शक फलक तातडीने बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी शिरूर यांना लेखी निवेदन देत, या मार्गावरील धोकादायक चौकावर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित मार्गावर नवीन प्रशासकीय इमारत, पोलिस ठाणे, पंचायत समिती यांसह विविध शासकीय कार्यालये असल्याने वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, तसेच अधिकारी-कर्मचारी यांना चौक ओलांडताना धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, शिरूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे यांनीही तहसिलदार कार्यालयाकडून प्राप्त पत्रानुसार नगरपरिषदेने या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, दुभाजक, सिग्नल यंत्रणा व दिशादर्शक फलक बसविण्याची कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे. यापूर्वीही या ठिकाणी अपघात झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button