Uncategorizedराष्ट्रीयविशेष

माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत, दूरदृष्टीचे व अभ्यासू नेतृत्व: प्राचार्य महासंघचे माजी अध्यक्ष तथा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ सचिव नंदकुमार निकम

बोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, यशवंतराव चव्हाण चौक डंबेनाला व शिरूर नगरपरिषद येथे यशवंतराव चव्हाण यांच्या ११४ व्या जयंती निमित्त अभिवादन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत, दूरदृष्टीचे व अभ्यासू नेतृत्व होते. उत्तम संघटन कौशल्य, परिपक्व विचार आणि प्रभावी लेखनशैली यांमधून त्यांनी नेतृत्वाची वेगळी उंची गाठली. लेखन आणि विचार कसे असावेत, हे यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यातून

oplus_131074

शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त शिरूर शहरातील यशवंतराव चव्हाण चौक (डंबेनाला), शिरूर नगरपरिषद तसेच चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

oplus_131074

बोरा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना निकम म्हणाले, की आज समाजात सुसंस्कृतपणा कमी होत चालल्याची खंत वाटते. यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचे, व्यासंगी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जुळवून घेणारे नेते होते. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीची पायाभरणी त्यांच्या नेतृत्वातून झाली. आपल्या वडिलांचे चव्हाण यांच्याशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे त्यांना जवळून ऐकण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन केंद्र संयोजक प्रा. डॉ. अंबादास केत यांनी केले, तर आभार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव, डॉ. सतीश पाटील, प्रा. डॉ. राजाभाऊ भैलूमे, संजय देशपांडे,प्रा. सतीश धुमाळ, निळोबा भोगावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, शिरूरच्या डंबेनाला परिसरातील यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनेही चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मावळाई प्रकाशनचे प्रमुख डॉ. सुभाष गवारी म्हणाले, की आज महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे, त्यामागे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची दूरदृष्टी आहे. युवकांनी वाचनाची सवय वाढवून इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिरूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिरीष लोळगे , प्रा. चंद्रकांत धापटे, भाजपचे निलेश नवले, शिवसेनेचे बाळू महाराज जोशी, माजी मुख्याध्यापक इंद्रजित कळमकर, नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी दत्तात्रेय बर्गे, प्रा. सतीश धुमाळ, माजी अधिकारी सुनील करळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
तसेच मनसे शहरप्रमुख आदित्य मैड, एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी संजय कडेकर, महेश रासने, सुनील चौधरी यांच्यासह प्रतिष्ठानचे राजू शेजवळ, सुधाकर ओतारी, सर्फराज सौदागर, संतोष गादिया, कन्हैयालाल दुगड, सतीश गवारी, दत्ता अभंग आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन माधव मुंडे यांनी केले, तर आभार बाळासाहेब झाडगे यांनी मानले.
दरम्यान, शिरूर नगरपरिषद कार्यालयातही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button