राष्ट्रीय
शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ ला सहसंचालकांची सदिच्छा भेट; संगणक लॅब व ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाचे कौतुक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील पी. एम. श्री शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (मुंबई बाजार) येथे प्राथमिक शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांकडून संगणक लॅबचा प्रभावी वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान काठमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विविध प्रश्न विचारले. तसेच ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाची अंमलबजावणी, शाळेतील भौतिक सुविधा आणि शालेय पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती घेतली.
शिक्षकांना मार्गदर्शन करत त्यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले.
यावेळी शिरूरचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती नितेश गादिया, शिक्षण समिती सदस्य सागर नरवडे, माजी गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, प्रशासन अधिकारी किसन खोडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
शाळेतील शैक्षणिक उपक्रम, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत काठमोडे यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले.







