निधन वृत्त
प्रसिद्ध वीट उत्पादक व्यावसायिक प्रल्हाद गवळी यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील प्रसिद्ध वीट व्यवसायिक प्रल्हाद रंगनाथ गवळी (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वीट व्यवसाय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.ते काका या नावाने प्रसिद्ध होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, चार पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. वीट व्यवसायिक शरद गवळी,अश्विनी सचिन दुर्गे व प्रियंका विक्रम येळवंडे यांचे ते वडील होत. तसेच प्रसिद्ध वीट उत्पादक ज्ञानदेव गवळी व सोपान गवळी यांचे ते बंधू होत. शिवसेनेचे पदाधिकारी निलेश गवळी यांचे ते काका होत.
गवळी यांनी वीट व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे शिरूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.








