Uncategorizedनिधन वृत्त
प्रसिद्ध टेलर्स अजय मगर यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील प्रसिद्ध टेलर्स अजय बबन मगर (वय २६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे शिरूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय मगर हे शांत, मनमिळावू आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे तरुण म्हणून परिचित होते. परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार व ओळखीच्या मंडळींमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व मामा असा परिवार आहे. ते टेलर्स बबन मगर यांचे सुपुत्र होते. अक्षय मगर यांचे ते बंधू होत.तसेच बापू नवले, दीपक नवले, योगेश नवले व संजय नवले , सचिन नवले गणेश यांचे ते भाचे होत.






