राष्ट्रीय

नारी सन्मान सोहळा व ‘खेळ पैठणी’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पैठणी’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून इलेक्ट्रिक बाईक निशा माधव सानप,द्वितीय पारितोषिक फ्रीज काजल संदीप वाघ तर तृतीय पारितोषिक एलईडी टीव्ही आशिका दीपक राठोड यांना मिळाले.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त सेंटर शाळा मैदान येथे ‘नारी सन्मान सोहळा २०२६’ व ‘खेळ पैठणी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सुमारे दोन हजारांहून अधिक महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात शिरूर नगरपालिका शाळा क्र. ४ येथे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष श्री. मितेश गादिया, सभापती, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी  प्रितम पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, उपसभापती  स्वप्नाली जामदार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास समितीच्या सभापती स्वाती साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती  सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती  एजाज बागवान

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

तसेच नगरसेविका संगीता मल्लाव,  चारुशीला कोळपकर,,सविता राजापुरे आणि नगरसेवक अभिजित पाचर्णे व निलेश गाडेकर, आमदार माऊली  कटके यांच्या पत्नी मनीषा कटके आदी उपस्थित होते.कार्यक्रमात सुमारे २००० ते २२०० महिलांच्या उपस्थितीत ‘माझी वसुंधरा’ शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांनी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘नारी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राजकीय क्षेत्रात  स्वाती घावटे (सभापती, शिरूर पंचायत समिती), सामाजिक क्षेत्रात उषा वाखारे (वात्सल्यसिंधू फाउंडेशन) व  शशिकला काळे, प्रशासकीय क्षेत्रात आयपीएस अधिकारी मानसी साकोरे, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू कु. वैष्णवी वाखारे (ज्यूदो) व कु. ईश्वरी पाचुंदकर (कुस्ती) तसेच वैद्यकीय क्षेत्रात गोल्ड मेडलिस्ट  महेक शेख (एमएचएमएस) यांचा सन्मान करण्यात आला.खेळ पैठणी’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून इलेक्ट्रिक बाईक, द्वितीय पारितोषिक फ्रीज, तर तृतीय पारितोषिक एलईडी टीव्ही देण्यात आले. यात निशा माधव सानप यांनी प्रथम क्रमांक पटकावत इलेक्ट्रिक बाईक जिंकली.  काजल संदीप वाघ यांना द्वितीय क्रमांकाचा फ्रीज, तर  आशिका दीपक राठोड यांना तृतीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही मिळाला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना गुलाबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button