Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूरमध्ये रामनवमी उत्साहात; ‘जय श्रीराम’च्या जयघोषात भक्तिभावाचा उत्सव

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}“सियावर रामचंद्र की जय, जय सियाराम”च्या गजरात शिरूर शहरात प्रभू श्रीराम नवमी उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील राम आळी परिसरातील पुरातन समस्त नामदेव शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरात रामजन्म सोहळ्यानिमित्त विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. सदाशिव महाराज चोगे यांनी आपल्या प्रवचनातून श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांवर प्रकाश टाकला.

वारणा दूध डेअरी शिरूरचे संचालक व माजी प्रा. शशिकांत राजे जाधव { सरकार } यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट 24च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

“प्रत्येकाचे जीवन राममय व कृष्णमय झाले पाहिजे. एकमेकांमध्ये भगवंत पाहून मानवसेवा करावी आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा,” असे आवाहन त्यांनी केले. आयुष्यात त्याग आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रवचनानंतर श्रीराम जन्माचा पाळणा सोहळा पार पडला. तसेच महाआरती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रमास समस्त नामदेव समाजाचे विश्वस्त, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, विवेक बगाडे, महेश बोत्रे, राजेंद्र बोत्रे, मंगेश क्षीरसागर, मिलिंद क्षीरसागर, संकेत गुजर, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक अभिजित पाचर्णे, उमेश शेळके, गायक वैभव बढे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विनायक म्हसवडे, संतोष येवले ऍडव्होकेट.बाजीराव वाखारे, डॉ. शिल्पा घोडे, प्रकाश बाफना आदी मान्यवरासह सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
दरम्यान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शिरूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामलिंग मंदिर, शिवसेवा मंदिर आणि शनि मंदिर येथेही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button