Uncategorizedविशेषशैक्षणिक

विद्याधाम प्रशालेची परिजा मगर हिला दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण; गणित व संस्कृतमध्ये विद्यार्थ्यांची शतकी कामगिरी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}येथील विद्याधाम प्रशालेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत प्रशालेचा निकाल ९९.७६ टक्के लागला असून ४३४ पैकी ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या निकालात परिजा राम मगर हिने ५०० पैकी ५०० गुण मिळवत शंभर टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच गणित विषयात तीन विद्यार्थ्यांनी तर संस्कृत विषयात पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे.

प्रशालेतील ६५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असून २३७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे यांनी दिली.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी

प्रशालेतील प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये परिजा राम मगर (१०० टक्के), सिद्धी संतोष गुंड (९९.२० टक्के), श्लोक जालिंदर साबळे (९८.८० टक्के), वैष्णवी संदीप वाघ (९८.४० टक्के) व समृद्धी भरत कारखिले (९८.२० टक्के) यांचा समावेश आहे.

विषयनिहाय गुणवंत

मराठी विषयात समृद्धी कारखिले हिने ९७ गुण मिळविले. संस्कृत विषयात सिद्धी गुंड, समृद्धी कारखिले, वैष्णवी वाघ, आदिती ओहोळ व श्लोक साबळे यांनी प्रत्येकी १०० गुण मिळविले. हिंदी-संस्कृतमध्ये समृद्धी वराळ हिला ९६ गुण मिळाले, तर हिंदी विषयात वैष्णवी साळुंके व वैष्णवी जाधव यांनी ९१ गुण प्राप्त केले.

इंग्रजी विषयात सिद्धी गुंड, वैष्णवी वाघ, समृद्धी वाळके, ऋतुजा वाघमारे, स्नेहा आटोळे व वैष्णवी भिसे यांनी ९५ गुण मिळविले. गणित विषयात स्नेहा आटोळे, श्लोक साबळे व साईराज कुरंदळे यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले. विज्ञान विषयात श्लोक साबळे याने ९९ गुण, तर समाजशास्त्र विषयात सिद्धी गुंड हिने ९९ गुण मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष धरमचंदज फुलफगर, सचिव तथा माजी प्राचार्य नंदकुमार निकम, मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देवीकर, दिगंबर नाईक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button