Uncategorizedमहाराष्ट्रविशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} : शहरातील वाढती लोकसंख्या, दाट वस्त्या आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन शिरूर नगर परिषदेकडून अग्निशमन व बचाव व्यवस्थेत महत्त्वाची भर घालण्यात आली आहे.
आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेकडे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे आणखी एक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ वाहन दाखल झाले असून त्यामुळे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

तसेच जखमींना तातडीने हलविण्यासाठी फोल्डिंग स्ट्रेचर आणि उंच ठिकाणांवर किंवा खोल दरीत अडकलेल्या व्यक्तींच्या सुटकेसाठी विशेष दोऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या वाहनाचे लोकार्पण नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया,बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव , स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती एजाज अन्सार बागवान, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार, नगरसेविका संगीता महेन्द्र मल्लाव, चारुशिला कोळपकर , नगरसेवक निलेश केरू गाडेकर, संतोष प्रभाकर थेऊरकर, सागर त्रिंबक नरवडे, अभिजित गणेश पाचर्णे,यांच्यासह प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, सचिन वाळूंज, अग्निशमन अधिकारी, महेश कदम, आदी उपस्थित होते.