Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: वाढदिवस म्हटला की फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरातींचा गाजावाजा दिसून येतो. मात्र, म्हाडाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये सामाजिक बांधिलकीचा वेगळाच आदर्श पाहायला मिळाला. शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात व माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात यांनी फ्लेक्स व अन्य खर्चाला फाटा देत वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या ‘आपले घर’ या निराधारांसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी २१ हजार रुपयांची मदत दिली.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा निराधारांसाठी उभ्या राहत असलेल्या प्रकल्पाला मदत करण्याचा निर्णय घेतला.”
“आढळराव हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत धावून जाणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व आहे,” असेही त्यांनी नमूद केले.