महाराष्ट्र

पुणे ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीत प्रकाश चंद्रकांत बाफना यांची निवड

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम,-24}: पुणे ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (पाडा) २०२६-२७ वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये शिरूरचे उद्योजक प्रकाश बाफना यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.

अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष वीरमीत सिंग मैनी यांची बिनविरोध पुनर्निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी काश्मीर नागपाल, सचिवपदी अभिजीत देशपांडे, तर खजिनदारपदी सुनील गोयल यांची निवड झाली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून महेंद्र शॉ, जसप्रीत सिंग मैनी, कुणाल नागपाल, राहुल मालपाणी, विश्वास अवचट, भूषण कामदार, जयगोपाल नायर, सचिन अग्रवाल, संजीव अग्रवाल, प्रकाश बाफना, प्रशांत बन्सल, निमेश शाह, सुरिंदर सिंग, हरेंद्र सिंग बहल आणि अभिषेक अग्रवाल यांची निवड करण्यात आली.

प्रकाश बाफना हे शिरूरमधील प्रमुख ऑटोमोबाईल व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. तसेच ते शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य असून सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

त्यांच्या निवडीबद्दल व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button