राष्ट्रीय

गोमाता बने राष्ट्रमाता’ अभियानासाठी शिरूरमध्ये 10 मे रोजी जनजागृती कार्यक्रम

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: भारतीय संस्कृतीत गोमातेचे स्थान अधोरेखित करत ‘गोमाता बने राष्ट्रमाता’ या अभियानांतर्गत १० मे रोजी शिरूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मैं भारत हूँ फाउंडेशन’च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, भारतीय संस्कृती आणि गोसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे आंतरराष्ट्रीय गोमाता महासंघ सांगितले.नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीणकुमारी भंडारी यांनी दिली.

रविवारी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात गोसंवर्धन, भारतीय संस्कृतीचे जतन आणि ‘भारत’ या नावाच्या वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. “भारत को केवल भारत ही बोलें, इंडिया नहीं” तसेच “गायों को चारा कर्तव्य है हमारा” अशा संदेशांद्वारे सामाजिक जागृतीचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या उपक्रमात आंतरराष्ट्रीय गोमाता सेवा महासंघाचे पदाधिकारी सहभागी होणार असून, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी, यांच्यासह नगरसेवक उमेश शेळके शिरूर तालुका भाजपा जैन प्रकोष्ठ अध्यक्ष नितीन भंडारी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 स्थानिक गोभक्त पोपटराव गाडेकर, नाना पोटे, अनघा पाठक, अतुल पाठक , शेखर भंडारी, लळासाहेब वाघचौरे, केशव लोखंडे, प्रमोद पवार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असून, शिरूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button