Uncategorizedस्थानिक

राखीव वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात वन विभागाची कारवाई

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर शहरातील हुडको कॉलनी च्या मागील डोंगरावर असणाऱ्या राखीव वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात वन विभागाने मोठी कारवाई करत ‘हजरत पीर सिद्धी बाबा दर्गा’ नावाने करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविले. शनिवारी सकाळी वन विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मौजे शिरूर येथील राखीव वन जमीन गट क्रमांक १४२० मधील अतिक्रमणाबाबत प्राथमिक गुन्हा अहवाल दाखल करण्यात आला होता. वन अधिनियम १९२७ मधील विविध कलमान्वये पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मोजणी अहवालाच्या आधारे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

सकाळी ही मोहीम पार पडली. वनरक्षक आशीष ठाकरे आणि उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी जुन्नर वन विभागातील अधिकारी स्मिता राजहंस, अमृत शिंदे, चैतन्य कांबळे, तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे ,व कर्मचारी, शिरूर पोलिस ठाण्याचे अधिकारी संदेश केंजळे तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कारवाईसाठी दोन जेसीबी आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करण्यात आला. वन विभागाने ही संपूर्ण कारवाई नियमानुसार केल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधितांना पूर्वसूचना व बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर वन नियमावली आणि एमएलआरसी कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने गव्हाणे यांनी सांगितले.

सध्या संबंधित जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button