Uncategorizedविशेष

वसूबारस निमित्त नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24,}: वसुबारस या सणाचे औचित्य साधून शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या वतीने गुरुवार (दि. ५ नोव्हेंबर) रोजी गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरूर नगरपरिषदेच्या नवीन इमारत परिसरातील पार्किंगसमोरील मोकळ्या जागेत नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले.

देशी गायींना ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वसुबारसच्या दिवशी गोमातेप्रती कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने या पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभापती स्वाती साठे, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजित पाचर्णे, उमेश शेळके, सागर नरवडे, संतोष थेऊरकर, निलेश गाडेकर, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ,नगररचना विभागातील पकंज काकड, महादेव गाजरे, चंद्रकांत पठारे, बाळासाहेब गाडेकर, भैय्या तारू आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button