शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेच्या मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका स्वीटी शिंदे यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली
स्वीटी शिंदे या वार्ड क्रमांक ११ मधुन भाजपकडून प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या सभापतीपदी निवडीबरोबरच समितीच्या सदस्यपदी नगरसेविका रिंकू जगताप, निलेश गाडेकर आणि दिनेश मांडगे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष नितीन पाचर्णे, बांधकाम समिती सभापती सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती एजाज बागवान, पाणीपुरवठा समिती सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती स्वाती साठे, माजी उपनगराध्यक्ष मितेश गदिया यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी स्वीटी शिंदे यांचे अभिनंदन केले. नगरसेवक निलेश पवार यांनी अभिनंदनपर भाषण केले.
निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, समितीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही नवनिर्वाचित सभापती स्वीटी शिंदे यांनी दिली.