Uncategorized
शिरुर पोलीसांनी जेरबंद केले मोटार सायकल चोरास
https://dailynewspost24.com/wp-content/uploads/2025/02/f318604dc54440ba84717f662627ef89.mp4
शिरुर दिनांक ( वार्ताहर )मोटर सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ११ गुन्हे उघडकीस आणत एकुण ६ लाख ६० हजार रू. किंमतीच्या ११ मोटर सायकल शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाने हस्तगत केल्या आहेत .

यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही काळात झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्याचे दृष्टीने शिरूर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.३९/२०२५ भा.न्या.सं.का.क. ३०३(२) व इतर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलींचा शोध घेणे चालु असताना पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि.वाशिम याचा मोटर सायकल चोरीमध्ये सहभाग असल्याची खात्री झाल्याने इंगोले यास मालेगाव, जि. वाशिम परीसरातुन ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता इंगोले कडून मालेगाव, जि. वाशिम येथून ९ हिरो कंपनीच्या स्पलेंडर प्लस मोटर सायकल, १ हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल, १ होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल अश्या एकुण ११ चोरी केलेल्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकलच्या अनुषंगाने १) शिरूर पोलीस स्टेशन १, २) धाड पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा १, ३) चाकण पोलीस स्टेशन १, ४) भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन १, ५) लोणीकंद पोलीस स्टेशन १, ६) खडकी पोलीस स्टेशन १. आळंदी पोलीस स्टेशन २, महाळुंगे पोलीस स्टेशन १, दिघी पोलीस स्टेशन १ व इतर एक असे एकुण ११ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ६,६०,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

इंगोले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरोधात १) जळुका पो.स्टे, जि.वाशिम, २) मालेगाव पो.स्टे जि.वाशिम, ३) पातुर पो.स्टे जि. अकोला, ४) जामनेर पो.स्टे जि. जळगाव, ५) लोणार पो. स्टे जि. बुलढाणा, ६) मेहकर पो.स्टे जि. बुलढाणा येथे दुचाकी चोरीसंदर्भातील एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती तपासात निष्पन्न झाली आहे.
संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि.वाशिम यास अटक करण्यात आलेली आहे .
या गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर, शिरूरचे पोलेस्स निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो.स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड यांनी केला .
