शिरुर येथे स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिन उत्सहात
शिरुर ( डेली न्युज पोस्ट टीम ) शिरूर शहरातील प्रीतमप्रकाश नगर येथील श्री. स्वामी समर्थ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिनानिमित्त रामआळीतील कुटेवाड्यातील शंकर महाराज मठ मंदिर पासून स्वामी समर्थ मंदिर प्रीतम प्रकाश नगर असा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
पालखीच्या अग्रभागी सुप्रसिध्द ब्रॉस बॅन्ड पथकाने मराठी व हिंदी भक्तिगीते व भावगीते सादर केली .पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या.श्री स्वामी समर्थाचा जयघोष यावेळी करण्यात आला .

रामआळी , पाच कंदिल चौक ,आडत बाजार , यशवंतराव चव्हाण चौक , मुंबई बाजार , कुंभार आळी , रामलिंग रोड , नवीन नगरपरिषद मार्गे ही पालखी मिरवणूक श्री . स्वामी समर्थ यांचे मंदिर असणा-या प्रीतम प्रकाश नगर मध्ये पोहोचली .
पालखीचा स्वागतासाठी यावेळी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या .

सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते .

श्री. स्वामी समर्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष ॲड . नारायण पवार, सचिव दिपक वर्मा, खजिनदार गणेश घाटगे, कार्यकारी सदस्य संपत लोखंडे, सचिन गुंजाळ, विष्णु वेताळ, प्रभावती पवार, चंद्रकांत निघोजकर ,भूषण कडेकर, मंगलाताई बागमार आदी आहेत .

दर गुरुवारी प्रीतम प्रकाश नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात स्वामीची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जात असल्याचे गणेश घाटगे व श्यामसुंदर चिखलीकर यांनी सांगितले .
