Uncategorized

शिरुर दिनांक ( डेली न्यूज टीम पोस्ट टीम ) – १६ जानेवारी  २०१६ रोजी शिरूर नगरपरिषद अभियंता संजय कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघ अध्यक्ष अनिल बांडे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सकाळी १० वाजता पालिकेच्या मुख्यद्वारापाशी आंदोलन करुन येण्या जाण्याचा रस्ता अडवून शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यापासून  मज्जाव केला . शासकिय कामात अडथळा निर्माण केला, तसेच पालिकेचे तत्कालीन अधिकारी , नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द अर्वाच्य भाषेत घोषणा,भाषण केले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(भा.द.वि.कलम ३५३,३४१,५०४,५०६ प्रमाणे)
*सदर प्रकरणी सरकार पक्षाने ८ साक्षीदार तपासले. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.तर बचाव पक्षी बांडे, सय्यद,खांडरे ह्यांचे तर्फे ॲड. सागर कोठारी, ॲड. नारायण पंडित यांनी  सदर कलम हे लागू होत नाही तसेच सरकार पक्षाने स्वतंत्र्य साक्षीदार तपासला नसून  कुठल्याही प्रकारचा शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे सिद्ध केले नाही अशी बाजू मांडली.

त्यांना ॲड. विनया जगनाडे, ॲड.शितल पानघाटे यांनी सहाय्यक म्हणून काम केले.
*ॲड. सागर कोठारी, ॲड नारायण पंडित यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत सत्र न्यायाधीश संजीवकुमार रा नरवाडे यांनी  महिबूब सय्यद, अनिल बांडे, मंगेश खांडरे ह्यांची निर्दोष मुक्तता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button