विशेष

शास्त्रीय गायक आनंद भाटे व गायिका आर्या आंबेकर

यांनी पंडितोत्स्व २०२५ या कार्यक्रमात रसिकांची गायनाने मने जिंकली

शिरुर ( वार्ताहर  ) गायिका आर्या आंबेकर व ज्येष्ठय  शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सादर केलेली  भक्तीगीते व शास्त्रीय गायनाने व जुगलबंदीने पंडितोत्सव -२०२५ मध्ये  रसिकांची मने जिंकून घेतली .  पंडितोत्सव २०२५ हा सांस्कृतिक कार्यक्रम कस्तुरी शिक्षण संस्था येथे झाला .

याच कार्यक्रमात कथ्थक नृत्यातील ज्येष्ठ गुरू शामा भाटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मागील  पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी नृत्य साधना केली असून, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आहे. तर कला साधना पुरस्कार, सुप्रसिद्ध कीबोर्डवादक आणि संगीतकार अभिजित पोहनकर यांना प्रदान करण्यात आला .
   यावेळी माजी गृहमंत्री दिलिपराव वळसे पाटील  ,  माजी आमदार काकासाहेब पलांडे  , माजी कुलगुरु डॉ .पंडितराव पलांडे , प्रतिमा फाउंडैशनच्या डॉ .  जयश्री पलांडे  , डॉ प्रतिक पलांडे  आदी उपस्थित होते.
 पुरस्कारा नंतर बोलताना शमा भाटे म्हणाल्या  या पुरस्काराने  नृत्याचा सन्मान व गौरव केल्या त्याबद्दल धन्यवाद . पुरस्काराने  मोठी जबाबदारी येते.अभिजीत पोहनकर म्हणाले की खूप संगीत ऐका जगभराचे संगीत ऐका. प्रिया बावरी हा अल्बम ग्लोबल ऑडियन्स पर्यत पोहोचला असे ते म्हणाले .
यावेळी स्वरमैफलीत   गायक आनंद भाटे यांनी ‘ सूर निरागस होवो ‘   तीर्थ विठ्ठल ही गाणे सादर करीत रसिकांची मने जिंकून घेतले .
आर्या आंबेकर यांनी पद्मनाभा नारायणा , बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल , अवचित परिमाळू , हे अभंग  व  मी मज हरपून बसले , कित्येकदा तुला नव्याने पहावे ही गीते सादर  केली .
तर मुरली बाजे , धुंदी कळ्यांना , तोच चंद्रमा नभात ही युगल गीते सादर केली . या सर्व गीताना उस्फूर्त अशी दाद रसिकांनी दिली .

डॉ . प्रतिक पंडितराव पलांडे यांनी   सांगितले की भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य ही कलाक्षेत्रातील समृद्ध परंपरा असून  ही कला ग्रामीण भागात रुजावी आणि लोकांना शास्त्रीय संगीत व नृत्य समजून घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रतिमा फाउंडेशनने  पंडितोत्सव या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली.

महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामीण शास्त्रीय कला मंचाच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाला टाटा हेंड्रिकसन सस्पेन्शन लिमिटेड यांचा पाठिंबा आहे  .  विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंदी आणि  स्वातंत्र्य सैनिक  शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा हिवरे कुंभार या स्थानिक शाळांतील विद्यार्थीही कथ्थक व गायन यावेळी सादर केले .
भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या अभिजात परंपरेचा आनंद घेण्यासाठी  या सोहळ्यालास मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button