Uncategorized
शेतातील शेततळ्यात बुडून तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम-24}: इनामगाव येथील केळीच्या शेतातील शेततळ्यात बुडून तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (३० जून) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक आकाश आमले (वय ३, रा. नांद्रेमळा, इनामगाव, ता. शिरूर, मूळ रा. मोहापूर, ता. किनवट, जि. नांदेड) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी वडील आकाश नामदेव आमले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

मंगळवारी दुपारी आकाश आमले, त्यांची पत्नी निकिता आणि इतर मजूर हे इनामगाव येथील संजय पंढरीनाथ सातव यांच्या केळीच्या शेतात काम करत होते. त्यावेळी सार्थक याला मोबाईलवर खेळण्यासाठी देण्यात आला होता. काही वेळाने मोबाईलचा आवाज येणे बंद झाल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने शेतमालक संजय सातव यांनी गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावले.

मंगळवारी दुपारी आकाश आमले, त्यांची पत्नी निकिता आणि इतर मजूर इनामगाव येथील संजय पंढरीनाथ सातव यांच्या केळीच्या शेतात काम करत होते. त्यावेळी सार्थकला मोबाईलवर खेळण्यासाठी देण्यात आला होता.
काही वेळाने मोबाईलचा आवाज येणे बंद झाल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने शेतमालक संजय सातव यांनी गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावले.
काही वेळाने मोबाईलचा आवाज येणे बंद झाल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने शेतमालक संजय सातव यांनी गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावले.
शेतातील शेततळ्यात शोध घेतला असता सार्थक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार शिंदे यांनी काम पाहिले.




