क्राईम
जबरी चोरी करून पसार झालेल्या आरोपीला २४ तासांत अटक
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}कारेगाव परिसरात भंगार गोळा करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून सुमारे ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयाने आरोपीला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता परमेश्वर शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या २७ जून रोजी रात्री कारेगाव येथील मजूर अड्ड्यावरून शिरूरच्या दिशेने जाण्यासाठी एका कारला हात दाखवून बसल्या होत्या.
प्रवासादरम्यान कारमधील अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील व कानातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांना शिरूर बायपास येथे सोडून दिले.
प्रवासादरम्यान कारमधील अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील व कानातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांना शिरूर बायपास येथे सोडून दिले.यानंतर संगीता शिंदे या एका परिचित व्यक्तीसोबत दुचाकीवरून गावाकडे निघाल्या असताना त्यांच्या
दुचाकीला टेम्पोची धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, अपघातापूर्वी त्यांनी जबरी चोरीची घटना मुलगा प्रभू परमेश्वर शिंदे याला दूरध्वनीवरून सांगितली होती. प्रभू शिंदे यांनी ही माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी संवेदनशील भूमिका घेत मयत महिलेच्या कुटुंबीयांना आधार देत २९ जून रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३१२/२०२६, बीएनएस कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या. सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ आणि दीपक दळवी यांनी कारेगाव परिसरासह पुणे-नगर महामार्गावरील २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. या तपासातून विनोद अनिल जाधव (वय ३६, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार (एमएच १२ ईजी २५८५) आणि चाकू जप्त केला.

आरोपीला ३० जून रोजी रात्री अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अपहरण करून खून तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग, अतिरिक्त कार्यभार शिरूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासात पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, दीपक दळवी, संदीप भांड, नितीन दळवी, प्रतीक खरबज, पंडित मुंढे तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे आणि नितेश थोरात यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत.