राष्ट्रीयविशेष

आईच्या संस्कारांचा प्रेरणादायी जागर; मातोश्री गंगूबाई घावटे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई”… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला आकार देणारी, संकटात धैर्य देणारी आणि यशाचा मार्ग दाखवणारी शक्ती म्हणजे आई. अशाच मातृऋणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत, स्वर्गीय मातोश्री गंगूबाई प्रभू घावटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, जांभळी मळा (शिरूर) येथे त्यांच्या अर्धपुतळ्याचे भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. यानिमित्त आळंदी येथील प्रसिद्ध ह.भ.प. सचिन महाराज पवार यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थितांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. राजेराम प्रभू घावटे यांनी सांगितले की, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीत आणि संस्थेच्या वाटचालीला दिशा देण्यात मातोश्री गंगूबाई घावटे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कष्ट, त्याग, संस्कार आणि जीवनमूल्यांची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने संस्थेच्या आवारात त्यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.त्याच बरोबर आईच्या स्मृती प्रित्यर्थ होतकरू गुणवंत विदयार्थ्यांन साठी आईच्या नावाने शिष्यवृत्ती जाहिर केली.

या कार्यक्रमास यशदाचे संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आयपीएस अधिकारी प्रशांत सुभे,प्रभू घावटे,माजी आमदार काकासाहेब पलांडे, राणीताई निलेश लंके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, मालतीताई बाबुराव पाचर्णे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, भाजपचे नेते धर्मेंद्र खांडरे, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे,चांगदेव पिंगळे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, शिरूर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, माजी सभापती सुदामराव पवार,रामचंद्र कर्डीले, सूर्या इलेक्ट्रिकल्स चे रमेश चौधरी,माजी नगरसेवक सुकुमार बोरा, भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, प्रकाश बाफना, माजी पोलीस अधिकारी बाबर,  पंचायत समिती सदस्य  दिपक कोहोकडे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक, पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, क्रांतवीर प्रतिष्ठानचे संजय पाचंगे, डॉ.भाऊसाहेब पाचुंदकर, डॉ. संदीप कोकरे, डॉ. सुभाष गवारी, डॉ. भळगट, डॉ. सतीश आंधळे, डॉ. विक्रम घावटे, डॉ. राहुल घावटे, माजी सरपंच विलास कर्डीले, उपसरपंच संजय शिंदे,  बाबाजी वर्पे, बाळासाहेब दसगुडे,शिरीष बरमेचा, माजी मुख्याध्यापक अनिल तांबोळी, प्रा. विलास आंबेकर, माजी सरपंच विलास कर्डीले, बाबुराव पाचंगे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, डॉ. दिपक गायकवाड, माजी सरपंच जगन्नाथ पाचर्णे, माजी सरपंच अरुणराव घावटे, विठ्ठलराव घावटे, दिनकर पाडळे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, डॉ अमोल शहा, प्रा. चंद्रकांत धापटे ,अनिल पोटावळे, शामराव वाखारे, व्ही. डी शिंदे सर, नगरसेवक व नगरसेविका विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात आई-वडिलांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रतिकूल परिस्थितीतही दुर्दम्य आशावाद, शिक्षणाची ओढ आणि कष्ट करण्याची तयारी ही यशाची त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात घेतलेली भरारी ही मातोश्री गंगूबाई आणि पिताश्री प्रभू घावटे यांनी दिलेल्या संस्कारांचेच फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. “कष्टाला कधीही लाजू नका आणि शिक्षणाची कास सोडू नका,” हा मातोश्रींनी दिलेला जीवनमंत्र आजही प्रेरणादायी असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमात मातोश्री गंगूबाई घावटे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या त्याग, ममत्व, संस्कार आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या जीवनमूल्यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत मिळत राहावी, यासाठी उभारण्यात आलेला अर्धपुतळा हा केवळ स्मारक नसून मातृशक्तीप्रती कृतज्ञतेचे आणि संस्कारांच्या चिरंतन परंपरेचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

उपस्थिताचे ऋण प्रसाद घावटे, सविता घावटे, शांताबाई जयवंत डांगे, हिराबाई धोंडीराम तरटे,  अश्विनी सूरज लांडगे, नंदा बाजीराव घावटे, अमृतेश्वरी घावटे, दिपक घावटे, सुनील घावटे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button