सांस्कृतिक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24,}ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कराओके संगीत मैफिलीने शिरूरकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. राजभोग बँक्वेट हॉल येथे आयोजित या मैफिलीत जुन्या-नव्या लोकप्रिय हिंदी गीतांचे सुरेल सादरीकरण झाले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली.

पुढे ‘छप्पा छप्पा चरखा चले’, ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘सागर जैसी आँखोंवाली’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘जा रे उड जा रे पंछी’, ‘रिमझिम रिमझिम’, ‘कौन है जो सपनों में आया’, ‘मैने प्यार किया’, ‘और इस दिल में क्या रखा है’, ‘पहला नशा’ आणि ‘गजब का है दिन’ यांसारख्या लोकप्रिय गीतांची एकापाठोपाठ एक सादरीकरणे झाली.


