महाराष्ट्र
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत तब्बल २२३ शिक्षक पदे रिक्त असल्याचा दावा करत ही पदे तातडीने भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसलब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
मागण्यांची दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर शांततापूर्ण सामाजिक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून ही बाब भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सामाजिक प्रश्नांबाबत प्रशासनाकडून संवादाचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेवरील पालकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
