
या निमित्ताने विद्यार्थ्यांना सनदी लेखापाल व्यवसायातील संधी, व्यावसायिक मूल्ये आणि यशाचा मंत्र उलगडून सांगण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा सनदी लेखापाल सीए सार्थ अतुल बोथरा होते. अवघ्या २२ व्या वर्षी सनदी लेखापाल होण्याचा मान मिळवलेल्या बोथरा यांनी आपल्या यशाचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. विद्यार्थ्यांनीही सीए अभ्यासक्रम आणि करिअरविषयक विविध प्रश्न विचारत संवादात्मक सत्राचा लाभ घेतला.


करिअरच्या विविध वाटा आणि व्यावसायिक नैतिकतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सनदी लेखापाल व्यवसायाबाबत प्रेरणा मिळाली असून भविष्यात सीए होण्याचा संकल्प अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला
