विशेषसांस्कृतिक

कराओके संगीत मैफलीत जुन्या-नव्या हिंदी गीतांचा सुरेल संगम; २७ जून रोजी शिरूरमध्ये रंगणार ‘सुरांची अविस्मरणीय संध्या’

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}संगीतप्रेमींसाठी एक सुरेल पर्वणी ठरणारी ‘कराओके संगीत मैफल – या गाऊया… मनातलं गाणं!’ हा बहारदार कार्यक्रम शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राजभोग बँक्वेट हॉल, शिरूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ७०च्या दशकापासून आजपर्यंतच्या सदाबहार हिंदी गीतांचा मनमोहक नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.

या संगीत मैफलीत गणेश मराठे आणि ओंकार संगीत विद्यालयातील विद्यार्थी आपल्या सुमधुर आवाजात विविध गाजलेली हिंदी गीते सादर करणार आहेत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, कुमार सानू आणि सुरेश वाडकर यांच्या अजरामर गीतांबरोबरच अनेक लोकप्रिय गाण्यांचा सुरेल आनंद रसिकांना घेता येणार आहे.

आधुनिक ध्वनीव्यवस्था, लाईव्ह कराओके संगीत आणि दर्जेदार सादरीकरणामुळे संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रम तपशील :

दिनांक : २७ जून २०२६

वेळ : सायंकाळी ६.०० वाजता

स्थळ : राजभोग बँक्वेट हॉल, शिरूर

संपर्क : ९६३७१५३५०२

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, शिरूरकर संगीतप्रेमींना अविस्मरणीय सुरेल संध्येचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होÔणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button