राष्ट्रीय

छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त अभिवादन व रक्तदान शिबीर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, २४}: छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त समस्त शिवशंभू भक्त, शिरूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे,पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनीता पोटे,नगरसेविका स्वीटी शिंदे, संगीताताई मल्लाव, सागर नरवडे, अभिजित पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंगडे मामा, नानासाहेब पोटे, प्राचार्य डॉ.समीर ओंकार,माजी नगरसेवक विनोद भालेराव, आखिल भारतीय मराठा महासंघ तालुकध्यक्ष श्यामकांत वर्पे,भाजपच्या अनघा पाठक, विजय नरके, प्रमोद पवार, पुष्पराज पोटावळे, प्रा. चैतन्य वाघ यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिबिराचे संयोजक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिरूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठ विचार समजावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचेही यावेळी वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात ओम ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button