विशेषसांस्कृतिक

येसूवहिनींच्या त्यागाची कहाणी उलगडणार ‘मी… येसूवहिनी’ सांगीतिक अभिवाचनातून

आकांक्षा विशेष मुलामुलींच्या संस्थेतर्फे १६ ऑक्टोबरला शिरूरमध्ये आयोजन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनप्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या येसूबाई सावरकर अर्थात येसूवहिनी यांच्या त्याग, प्रेम, धैर्य आणि समर्पणाची हृदयस्पर्शी कहाणी ‘मी… येसूवहिनी’ या विशेष सांगीतिक अभिवाचनातून उलगडणार आहे. आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आकांक्षा विशेष मुलामुलींच्या संस्थेच्या वतीने आकांक्षा हिच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता शिरूर येथील राजभोग बँक्वेट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, जुना पुणे–नगर रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील ‘समिधा’ प्रस्तुत या विशेष सांगीतिक अभिवाचनातून येसूवहिनींचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, कुटुंबाप्रती असलेली निष्ठा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी असलेल्या नात्याचे विविध पैलू रसिकांसमोर साकारले जाणार आहेत.

इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या एका कर्तृत्ववान स्त्रीचा त्याग आणि संघर्ष जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. समाजात स्त्रीशक्ती, नात्यांमधील जिव्हाळा आणि समर्पणाची भावना जागविणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याला नागरिकांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा राणीताई चोरे यांनी केले आहे.

स्थळ : राजभोग बँक्वेट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, जुना पुणे–नगर रोड, शिरूर.

वेळ : शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६, दुपारी ३.३० वाजता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button