Uncategorizedराष्ट्रीयलेखविशेष
नवरात्र विशेष | कर्तृत्वातून स्त्रीशक्तीचा जागर; सरपंच वर्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला आधार देणारी उद्योजिका, तर कधी महिलांच्या स्वावलंबनासाठी धडपडणारी समाजसेविका—अशा विविध रूपांतून स्त्रीशक्तीचा जागर घडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तर्डोबाचीवाडीच्या सरपंचपदापासून उद्योगविश्वापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे (पोटावळे)!

नवरात्राच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना स्त्रीशक्तीचे आधुनिक रूप अधोरेखित होते.
लोकनेते आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच म्हणून काम करताना ग्रामविकास, स्वच्छता, लोकसहभाग आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले.







