Uncategorized

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहा महिने पुढे ढकलली शासनाचा आदेश जारी;

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रक्रिया सहा महिने पुढे ढकलण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक आता आणखी सहा महिने लांबणीवर पडली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश काढला. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय यंत्रणा सध्या विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर राहणार असून, ती आदेशाच्या दिनांकापासून आणखी सहा महिने पुढे ढकलण्यात येणार आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर २८ जुलै २०२६ रोजी निवडणूक घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.

मात्र, आता शासनाच्या नव्या आदेशामुळे शिरूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सहा महिने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button